लातूर - जिल्हयात भारतीय अंग निर्माण निगम (एलिम्को) मार्फत साहित्याचे वितरण करण्या करिता तपासणी शिबीराचे तालुका निहाय आयोजन दिनांक ३१ डिसेंबर २०१९ ते जानवारा २०२० या कालावधीत होणार या शिबीरात एकही दिव्यांग सुविधेपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने घ्यावी अशी सूचना खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दिव्यांग शिबीर अयोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर श्रृंगारे म्हणाले की, प्रत्येकाने दिव्यांगासाठी आस्था दाखवणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागाने दिव्यांगासाठी शासनाने दिलेल्या उद्विष्टाची पर्ती करणे गरजेचे आहे.लातूर जिल्हयातील एकही दिव्यांग शासकीय सुविधेपासून वंचित राहणार नाही याची प्रत्येक विभागाने काळजी घ्यावी असे सूचित केले. यावेळी जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, दिव्यांगाशी प्रत्येक व्यक्तीनी आपली आस्था दाखवून दिव्यांग प्रति आधारभाव जिल्हाधिकारी निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. जिल्हयातील आयोजित तालुकास्तरीय कॅम्प शिबीरात एकही दिव्यांग या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संबंधित विभागाने काळजी घेवून दिव्यांग व्यक्तीस कृत्रिम अवयव देण्यास सहकार्य करावे असे सूचित केले. या बैठकीस विजयाचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, संबंधीत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ल
जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती सविधेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-खा. सुधाकर श्रृंगारे