लातूर : मागील महिन्यात झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या काँग्रेसने भाजप सदस्यांना फोडून काबीज केली आहे. त्यामुळे आज मनपाच्या परिवहन सभापतीच्या निवडीत काँग्रेस चमत्कार घडविणार का? सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसला निवडीत कोणताही चमत्कार घडविता आलेला नाही. भाजपाच्या वतीने सभापतीपदासाठी पुन्हा एकदा मंगेश बिराजदार यांना सभापतीपदी संधी देण्यात होती. या सभापतीच्या निवडीत बिराजदार यांनी या संधीचे सोने पुन्हा एकदा सभापतीपद पटकाविले आहे. काँग्रेसचे इसरार सगरे यांचा पराभव करत मंगेश बिराजदार यांनी विजय प्राप्त केला. या विजयानंतर पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते नूतन सभापती मंगेश बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर भाजपाच्या परिवहन सदस्यांसह नगरसेवकांनी मंगेश बिराजदार यांच्यावर आमनदनाचा वषाव करत त्याच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. आज सकाळी मनपाच्या नूतन सभागृहात परिवहन समिती सभापतीच्या निवडीकरीता परिवहन सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी परिवहन समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये भाजपाच्या वतीने पुन्हा एकदा मंगेश बिराजदार तर काँग्रेसच्या वतीने इसरार सगरे यांनी आपले अर्ज दाखल केले होते. पीठासन अधिकारी म्हणून काम करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या अर्जाची छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे घोषित केले. या दरम्यानच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. मात्र कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सभापतीपदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपाचे मंगश बिराजदार यांनी काँग्रेसचे इसरार सगरे यांचा पराभव केला. मंगेश बिराजदार यांना ७ ते इसरार सगरे यांना ६ मते प्राप्त झाली. मंगेश बिराजदार यांनी भाजपाच्या वतीने सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या संजय पाटील, धनंजय हाके, शिवदास मिटकरी, दिपक अवस्कर, मंगेश बिराजदार यांच्यासह पदसध्दि सदस्य म्हणून असलेले स्थायी समिती सभापती ऍड. दिपक मठपती यांनी मतदान केले.काँग्रेसचे इसरार सगरे यांना त्यांच्यासह राम चलवाड, जीवन सुरवसे, धोंडिराम यादव, राजू उटगे व संदीप मोहीते यांनी मतदान केले.
परिवहन समिती सभापतीपदी पन्हा मंगेश बिराजदार