महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपकडून निसटलं, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित

रांची : महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला मोठा झटका बसल्याचं दिसत झारखंड विधानसभा निवडणुकीच्या जागांचे कल हाती आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस राजद यांची सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला ४२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यंदा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आजसूला ३, झारखंड विकास मोर्चा ४ आणि इतरांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. २०१४ मध्ये ३७ जागा जिंकून आजसूसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने यंदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने ३४ टक्के मतांसह राज्यात सर्वाधिक मतं मिळवली, पण आघाडी म्हणून झामुमो आणि काँग्रेसने सत्ता काबीज केली.